
सेवा हाच धर्म मानून समाजसेवेचा दीप प्रज्वलित; गांधी उद्यान योग मंडळ, वरोराचा स्तुत्य उपक्रम करण्यात आला.
वरोरा : अभिषेक भागडे
“सेवा परमो धर्म” या तत्त्वाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत गांधी उद्यान योग मंडळ, वरोरा यांच्या वतीने समाजोपयोगी आणि मानवतेचा संदेश देणारे दोन महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले . समाजातील गरजू, दारिद्र्यरेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरला आहे.
या उपक्रमांतर्गत अत्यावश्यक प्रसंगी लागणारे लाकडे 9 मन मोफत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था गांधी उद्यान योग मंडळाने सुरू केली आहे. आर्थिक अडचणींमुळे अंत्यसंस्कार करताना अनेक कुटुंबांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे. दुःखाच्या क्षणी आधार देणारा हा उपक्रम समाजातील दुर्बल घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार .
तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी नेमाडे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय श्री. प्रभाकरराव नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अस्थी व अस्थमा सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा अंत्यविधीनंतर धार्मिक विधी पार पाडण्यासाठी नागरिकांना अत्यंत उपयुक्त ठरणार .
या दोन्ही समाजोपयोगी उपक्रमांचे लोकर्पण मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर संपन्न होत असून या कार्यक्रमाला
नगराध्यक्षा मा. सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे, नगर परिषद वरोरा यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाला.तसेच योगगुरू मा. श्री. प्रकाशजी संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा लोकर्पण सोहळा बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता
हिंदू स्मशानभूमी, वणी नाका, वरोरा येथे आयोजित करण्यात आला होता. नवनियुक्त नगराध्यक्ष यांनी गांधी उधान योग मंडळाचे आभार मानले.
समाजाच्या शेवटच्या प्रवासातही माणुसकी जपणारा, सेवाभाव जिवंत ठेवणारा गांधी उद्यान योग मंडळाचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरला आहे. या स्तुत्य कार्यासाठी मंडळाचे सर्वत्र कौतुक झाले. असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनीत :
गांधी उद्यान योग मंडळ, वरोरा.
🙏🏼 जय विदर्भ 🙏🏼
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732



