⭕🙏 सावित्रीबाई – ज्योतिबांच्या विचाराचा जागर : वरोरा येथे भव्य जयंती उत्सव उत्साहात साजरा 🙏⭕

— स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल | वरोरा |

वरोरा : अभिषेक भागडे


 वरोरा शहरातील बावणे लेआउट येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा व माता सावित्रीबाई फुले वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने, बुद्धिस्ट कर्मचारी समिती वरोरा संचालित संस्थांच्या पुढाकारातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख जैरुद्दीन छोटूभाई (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता व जिल्हा शांतता समिती सदस्य) हे होते.
उद्घाटन नगराध्यक्ष सौ. अर्चना आशिष ठाकरे (नगर परिषद, वरोरा) यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून धनराज साळवे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. चंद्रपूर), खेमराज भाऊ कुरेकार (नगरसेवक, वरोरा), भाऊराव चिवंडे (संस्थाध्यक्ष), सौ. साळवे मॅडम, तसेच संध्या ताई चिवंडे (अधीक्षक अभियंता, महावितरण, चंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादनाने झाली. सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर लहानग्यांचे नृत्य, सांस्कृतिक सादरीकरण यांमुळे कार्यक्रमाला रंगत आली.

मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून सावित्रीबाई व ज्योतिबांच्या क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकत शिक्षण, समता व सामाजिक परिवर्तनाचे विचार प्रभावीपणे मांडले. तसेच संस्थेच्या सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष चिवंडे सर यांचा छोटूभाई व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल–पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष अशोकराव सोनारकर, सचिव श्री. नंदेश्वर सर, सहसचिव कांबळे सर, रमेश हिवरकर सर यांच्यासह सर्व संचालक मंडळ, विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सहायक शिक्षिका, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावित्रीबाई–ज्योतिबांच्या विचारांची मशाल पुढे नेणारा हा कार्यक्रम वरोरात सामाजिक जागृतीचा नवा अध्याय ठरला, अशी भावना उपस्थितांतून व्यक्त झाली.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.☎️ 9673574711 ☎️ 8329889732

जय विदर्भ!