⭕🙏 मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात संपन्न 🙏⭕

 


मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

चंद्रपूर :✍️( अभिषेक भागडे )
आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने विहित नमुन्यात अर्ज सादर केलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती आज अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वी वातावरणात पार पडल्या.

या महत्त्वपूर्ण मुलाखती महाराष्ट्र प्रदेशाचे निवडणूक प्रभारी मा. श्री. चैनसुखजी भाई संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराज भैया अहिर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपल्या कार्याचा आढावा मांडत संघटनात्मक अनुभव, जनसंपर्क, सामाजिक सहभाग, विकासात्मक दृष्टिकोन तसेच निवडणुकीसंदर्भातील भूमिका सविस्तरपणे मांडली. उमेदवारांकडून प्राप्त अर्ज व मुलाखतीतून सादर झालेल्या माहितीच्या आधारे सर्व बाबींचा सखोल आणि सकारात्मक विचार करून पुढील टप्प्यात योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या प्रक्रियेमुळे निवडणुकीसाठी सक्षम, लोकाभिमुख व कार्यक्षम उमेदवारांची निवड होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. निवड होणाऱ्या सर्व उमेदवारांना आगामी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


{जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क}

📞 9673574711
📞 8329889732

—🙏जय विदर्भ🙏—