⭕🙏 चंद्रपूरच्या रेल्वे धरणे आंदोलनाचा मुद्दा पुन्हा सभागृहात घुमला 🙏⭕

✍️ अभिषेक भागडे
स्वतंत्र विदर्भ न्यूज, चंद्रपूर

🚆 चंद्रपूरच्या रेल्वे धरणे आंदोलनाचा मुद्दा पुन्हा सभागृहात घुमला!

चंद्रपूर येथे रेल्वे प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे आणि राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

आज, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत बोलताना या महत्त्वाच्या मागण्यांना पुन्हा अधोरेखित करण्यात आले. चंद्रपूरसाठी अत्यंत जीवनावश्यक असलेल्या रेल्वे सेवांचा प्रश्न तातडीने हाताळण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

📢 सभागृहात ठामपणे मांडलेल्या मागण्या

चंद्रपूर जिल्ह्याचा वाढता प्रवासी वर्ग, मोठी औद्योगिक वाहतूक, सतत वाढणारा विद्यार्थी वर्ग आणि रोजगाराच्या संधी यांचे महत्त्व लक्षात घेऊन खालील मागण्या सभागृहात जोरदारपणे मांडल्या—

1️⃣ चंद्रपूर–मुंबई डेली सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी

विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि रुग्ण प्रवासासाठी ही सेवा अत्यावश्यक.

2️⃣ चंद्रपूर–नागपूर डेली शटल सेवा सुरू करावी

विद्यार्थी व कामगार वर्गासाठी नागपूरला दररोजच्या प्रवासाची सोय होणार.

3️⃣ गोंदिया दुरंतो एक्सप्रेसची सुरुवात चंद्रपूरहून करावी

पूर्व विदर्भातील लाखो प्रवाशांसाठी मोठा दिलासा.

4️⃣ चंद्रपूर–कोलकाता माता महाकाली ते महाकाली थेट रेल्वे सेवा सुरू करावी

धार्मिक, व्यापारी व सामाजिक दृष्टिकोनातून ही ऐतिहासिक आणि महत्त्वाची मागणी.

🌟 “महाराष्ट्र सरकारने या मागण्या तातडीने केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात” — सभागृहात स्पष्ट भूमिका

चंद्रपूर आणि विदर्भातील जनतेचा आवाज ऐकला जाईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचे निर्धार सभागृहात व्यक्त करण्यात आला.

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-☎️ 9673574711☎️8329889732

—🙏जय विदर्भ 🙏—