⭕🙏 रेल्वे सेवांच्या नियमिततेसाठी साखळी उपोषणाला लोकप्रिय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची भेट व मागण्यांना ठाम पाठिंबा🙏⭕

चंद्रपूर : अभिषेक भागडे ✍️ रेल्वे सेवांच्या नियमिततेसाठी साखळी उपोषणाला नेत्यांची भेट; मागण्यांना ठाम पाठिंबा

चंद्रपूर- पुणे, चंद्रपूर- मुंबई आणि चंद्रपूर- कोलकाता या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या आठवड्यातील सर्व दिवस नियमित सुरू करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीतर्फे आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. या उपोषण मंडपाला भेट देत मागण्यांना ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता सदर गाड्या रोजच्या रोज सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे या मागण्यांबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. चंद्रपूरकरांच्या सोयीसाठी या मागण्यांना सकारात्मक मार्ग मिळावा म्हणून सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

नियमित रेल्वेसेवा सुरू झाल्यास रोजगार, शिक्षण, आरोग्य व व्यापार क्षेत्रात नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. —🙏जय विदर्भ🙏— { बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️9673574711 ☎️ 8329889732 }