⭕🙏 वरोरा नगर परिषद 2025 मधील प्रभाग क्रमांक 7 ( ब ) मधील निवडणूक प्रक्रिया तात्पुरती रद्द करण्यात आली होती. आता 20-12-2025 ला मतदान व 21-12-2025 मतमोजनी🙏⭕

( ब्रेकिंग न्यूज ) वरोरा ✍️ अभिषेक भागडे : वरोरा नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ७-ब मधील निवडणूक प्रक्रिया तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या प्रभागासाठी दोन स्वतंत्र उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

दोन उमेदवारांमुळे निर्माण झालेला वाद

राष्ट्रवादी पक्षातर्फे एका प्रभागातून केवळ एकाच उमेदवाराला अधिकृत उमेदवारी प्राप्त होऊ शकते. परंतु प्रभाग क्रमांक ७-ब मधून दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी स्वतःला राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करत अर्ज दाखल केला. यामुळे निवडणूक प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

दुसऱ्या उमेदवाराची अपील

या संदर्भात दुसऱ्या उमेदवाराने आपला दावा योग्य असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे अपील दाखल केले. अपीलची सुनावणी होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे नेणे शक्य नसल्याने आयोगाने तात्पुरता निर्णय घेतला.

निवडणुकीवर स्थगिती

अपील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रभाग क्रमांक ७-ब ची निवडणूक स्थगित व रद्द घोषित करण्यात आली आहे. अपीलचा निकाल लागल्यानंतर पुढील निवडणुकीची तारीख व प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

मतदारांमध्ये संभ्रम

या निर्णयामुळे स्थानिक मतदार आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन उमेदवारांची अधिकृतता, त्यावर दाखल झालेले अपील आणि निवडणूक रद्द होण्याचे कारण याबाबत अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा सर्वांना आहे. तसेच ही निवडणूक आता 20-12-2025 ला होणार असून  21-12-2025 ला मतमोजणी होणार आहे तशी माहिती शासनाने पत्रकार द्वारे जाहीर केली आहे तरी या निवडणुकीकडे संपूर्ण वरोरा शहराचे लक्ष वेधले असून  आहे.

—🙏 जय विदर्भ🙏—( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732 )