✍️अभिषेक भागडे
भद्रावती :- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामार्फत प्रचाराची धडाकेबाज तयारी सुरू झाली आहे. वरोरा–भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महत्त्वपूर्ण बैठकीचे भव्य आयोजन करण्यात आले.
या बैठकीत भद्रावती शहराच्या सर्व प्रभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवून मजबूत संघटन उभारणे, प्रभागनिहाय प्रचाराची आखणी, जनसंपर्क मोहीम व घरपोच अभियानाची दिशा ठरविणे या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
मा. करणजी देवतळे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पूर्णपणे खंबीर पाठबळ देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांना एकदिलाने, शिस्तबद्धपणे व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल अशा पद्धतीने निवडणूक लढविण्याचे आवाहन केले.
- विकास, पारदर्शकता आणि जनसेवा या त्रिसूत्रीवर आधारित निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करत ही प्रचारबैठक उत्साहात पार पडली. भद्रावतीच्या विकासाचा मार्ग पुन्हा एकदा कमळातूनच जातो, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.




