📰 वरोरा : टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. पै. डॉ. तानाजीभाऊ जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा 🎉

वरोरा ( अभिषेक भागडे ) –
टायगर ग्रुपचे राष्ट्रीय संस्थापक मा. पै. वस्ताद जालिंदरभाऊ जाधव यांच्या प्रेरणेतून व टा. ग्रुप चे खंदे युवा सामाजिक कार्यकर्ते रिषभभाऊ रठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा टा. ग्रुप मित्र परिवार तर्फे दिनांक २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष मा. पै. डॉ. तानाजीभाऊ जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने सामाजिक उपक्रमांतर्गत खांंजी वार्ड येथे राहणाऱ्या विवेकानंद प्राथमिक शाळेतील चौथी वर्गातील विद्यार्थिनी कु. अनुष्का सतिश सिडाम हिला शिक्षणासाठी प्रोत्साहनपर म्हणून सायकल भेटवस्तू देण्यात आली.

कार्यक्रमास शिवसेना (शिंदे गट) चे माननीय मुकेशभाऊ जिवतोडे (लोकसभा संघटक चंद्रपूर-वणी-आर्णी) तसेच अलेखभाऊ रठ्ठे (युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर-वरोरा-भद्रावती-ब्रह्मपुरी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी मारोती नामे, वैभव टिपले, अमोल सिरसागर, कृष्णा ठाकरे, ओम कार्लेकर, प्रवीण खिरटकर, मोहित तडस, विक्की गवही, मुकेश पाटील, चेतन सातपुते, अनिल मेश्राम, बादल ठावरी आदी टा. ग्रुपचे कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पूर्ण करून वरोरा टा. ग्रुपने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

—🙏 जय विदर्भ🙏—