Home जिल्हा HMPV Virus : नागपुरात आढळले ‘एचएमपीव्ही’ दोन रूग्ण

HMPV Virus : नागपुरात आढळले ‘एचएमपीव्ही’ दोन रूग्ण

जिल्हाधिकारी इटनकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

नागपूर (Nagpur) 07 जानेवारी :- कर्नाटक आणि गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ह्युमन मेटान्युमो व्हायरस (एचएमपीव्ही) आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. पत्रकार परिषदेला ‘एम्स’चे संचालक डॉ. प्रशांत जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. इटनकर यांनी सांगितले की, नागपुरातील 17 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षाच्या एका बालकाला मागील
काही दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप असल्याने रामदासपेठ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, औषधोपचारानंतरही त्यांचा आजार बरा होत नसल्याने रुग्णाचे नमुने नीरीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता दोघेही ‘एचएमपीव्ही’ बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर अधिक तपासणीसाठी रुग्णाचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) व पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आलेत. पुढील दोन ते तीन दिवसांत अहवाल येण्याची शक्यता आहे. या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता कमी असली तरी शासकीय रुग्णालयांना अलर्ट देण्यात आल्याचे डॉ. इटनकर यांनी सांगितले.

human metapneumovirus vs covid-19
HMPV symptoms
How long does it take to recover from human metapneumovirus
hMPV treatment
Hmpv news live
How long are you contagious with human metapneumovirus
hMPV pneumonia
hMPV contagious