Union Minister Nitin Gadkari- विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर

Union Minister Nitin Gadkari- विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर
airport-administration-action-modwar

नागपूर (Nagpur) :- नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. परिणामी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरच्या जनतेची माफी मागण्याची वेळ आली होती. तसेच एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला निर्देशही दिले होते. किंबहुना काम वेळेत न केल्यास संबंधीत कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या दणक्यानंतर आता विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. सोमवारी नितीन गडकरींनी नागपूर विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी केल्यानंतर धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच संथगतीने सुरू असलेल्या कामावर चिंता व्यक्त करत सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा इशारा ही दिला होता. यावर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यांनी 28 डिसेंबरला बैठक बोलावली आहे. यात नितीन गडकरी यांच्या सुचनांवर अमलबजावणी कशी करावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Nagpur news today
Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
Nagpur which state
Nagpur in which state in Map
Nagpur Pin code
Nagpur map
Nagpur city area in sq km