Home महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड्सची दिवाळी गोड

राज्यातील होमगार्ड्सची दिवाळी गोड

राज्यातील होमगार्ड्सची दिवाळी गोड
state-home-guards-diwali-god

 

मानधनात जवळपास दुप्पटीने वाढ

मुंबई (Mumbai) :- राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारन कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात केली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सरकारने पहिल्या टप्प्यात सुमारे 2 हजार 399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्ड्संदर्भातही (Home Guards) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने होमगार्डच्या मानधानात जवळपास थेट दुप्पट वाढ केली आहे. म्हणजेच होमगार्ड्सना मिळणारा पगार आता थेट दुप्पट झाला आहे. त्यासाठी सरकारने 795 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील होमगार्ड्सच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. या निर्णयाचा लाभ जवळपास चाळीस हजार होमगार्ड्सना होणार आहे. सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात. सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता हाच कर्तव्यभत्ता आता तेट 1 हजार 83 रुपये करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये, कवायत भत्ता 180 रुपये, खिसा भत्ता शंभर रुपये, भोजन भत्ता 250 रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 795 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai population
Mumbai Pin Code
Mumbai district Name
Where is Mumbai located in India
Mumbai weather
Mumbai Indians