लाडकी बहीण सुरू ठेवायची, तर फडणवीसच सीएम हवेत

लाडकी बहीण सुरू ठेवायची, तर फडणवीसच सीएम हवेत
ladaki-bahi-wants-to-continue-but-fadnavis-wants-to-be-the-cm

सुरेश खाडे यांचं मोठं वक्तव्य

सांगली (sangli) :- शासन बदलले की योजना बदलते. लाडकी बहीण योजना पुढे सुरू ठेवायची तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, असे प्रतिपादन सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले. भाजपतर्फे येथे ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खाडे बोलत होते. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. तर ‘लाडके देवाभाऊ पुढच्या वर्षी मुख्यमंत्री व्हावेत’, अशी सदिच्छा बहिणींनी व्यक्त केली.

खाडे म्हणाले, (Suresh Khade) शासन बदलले की योजना बदलते. त्यामुळे शासन बदलू द्यायचे नाही. फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे. मग दीड हजाराचे अनुदान आणखीही वाढेल. यावेळी सुमनताई खाडे, मुख्यमंत्री सहायता निधीचे मंगेश चिवटे, आमदार सुधीर गाडगीळ यावेळी उपस्थित होते.

Ladli Behna Yojana Online Apply
cmladlibahna.mp.gov.in list
cmladlibahna.mp.gov.in login
Ladli Behna Yojana Form
cmladlibahna.mp.gov.in status
Cm Ladli Behna mp gov in
Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply
Ladli Behna Awas Yojana List MP