बांगलादेशी हिंदू भारताच्या सीमेवर

बांगलादेशी हिंदू भारताच्या सीमेवर
Bangladeshi Hindus border India

पाण्यात उभे राहून जय श्री रामचे नारे

कूचबिहार :- बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार वाढले आहेत. तेथील मुस्लिमांनी शेख हसीना यांचे सरकार जाताच आता हिंदू कुटुंबियांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दहशतीत असलेले हजारो हिंदू कुटुंबे भारतात येण्यासाठी सीमेवर येऊन ठेपले आहेत. यामुळे बीएसएफ सावध झाली असून भारतात प्रवेश मिळविण्यासाठी बांगलादेशी हिंदू पाण्यात उभे राहून जय श्री रामचे नारे देत आहेत. भारत बांगलादेश (Bangladesh) सीमेवरून भारतात आधीच हजारो मुस्लिमांनी घुसखोरी केली आहे. हे घुसखोर पश्चिम बंगालमध्येच नाहीतर तर अगदी मुंबई, नवी मुंबईतही सापडलेले आहेत.

नवी मुंबईत तर गेल्या वर्षी एका हॉटेलमध्ये या घुसखोरांची पार्टी रंगली होती. त्यावर धाड टाकली गेली होती. केंद्र सरकारही या घुसखोरीमुळे चिंतेत असताना आता बांगलादेशातील हिंसाचारामुळे आणखी एक संकट ओढवले आहे.