क्रेनची बकेट कलंडून अपघात; जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्‍यात बचावले

क्रेनची बकेट कलंडून अपघात; जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्‍यात बचावले
Crane bucket overturning accident; Jayant Patil, Amol Kolhe survived briefly

 

पुणे:- जुन्नर (Junnar) येथील पंचलिंग चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला क्रेनच्या साह्याने हार घालून क्रेन खाली उतरत असताना क्रेनची बकेट कलंडल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी राष्‍ट्रवादीचे नेते थोडक्‍यात बचावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्‍पहार घालून पुन्हा क्रेन खाली घेताना क्रेन अचानक उलटल. या क्रेनच्या बकेटमध्ये बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रक्षा खडसे व युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख सुदैवाने बचावले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रक्षा खडसे, महेबूब शेख, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आधी सहभागी झाले. ही शिवस्वराज्य यात्रा जुन्नरच्या पंचलिंग चौकामध्ये आल्यावर उंचावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पूर्णाकृती पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने बकेट मधून जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे महेबूब शेख व रक्षा खडसे गेले. हार घातल्यानंतर क्रेन खाली उतरत असताना असताना क्रेनची बकेट कलंडली व व सुदैवाने अपघातातून जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महेबूब शेख, व रक्षा खडसे व महेबूब शेख बचावले.

क्रेन हळूहळू खाली घेऊन या सगळ्यांना क्रेनच्या बकेट मधून खाली उतरवण्यात आले. दरम्यान जुन्नर येथील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालण्यासाठी कायमस्वरूपी हायड्रोलिक लिफ्ट बसवण्यात यावी अशी मागणी शिवभक्तांची अनेक वर्षापासून आहे. परंतु प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.