ईडीच्या लाचखोर अधिकाऱ्याला सीबीआयने केली अटक

ईडीच्या लाचखोर अधिकाऱ्याला सीबीआयने केली अटक
CBI arrests bribe-taking officer of ED

 

सराफा व्यापाऱ्याकडून 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप

नवी दिल्ली (New Delhi) :- मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्याकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयने(CBI) ईडीच्या सहायक संचालकाला अटक केलीय. संदीप सिंग यादव असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून त्याला आज, गुरुवारी दिल्लीच्या लाजपतनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 3 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईतील एका ज्वेलर्सच्या दुकानाची झडती घेतली होती. त्यानंतर ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव यांनी ज्वेलर्सच्या मुलाला 25 लाख रुपये दिले नाहीस तर अटक करु अशी धमकी दिली होती. ज्वेलरच्या मुलाने जास्त पैसे मागत असल्याचे सांगत ही रक्कम 20 लाखांवर आणली. त्यानंतर संदीप सिंग यादवला लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, संदीप सिंग यादवने (Sandeep Singh Yadav) यापूर्वी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काम केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यादवला गुरुवारी दिल्लीतील लाजपत नगर भागातून अटक करण्यात आली. सीबीआयला तक्रार प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. ईडीने मुंबईत छापा टाकला होता आणि आरोपी व्यावसायिकाला अडकवण्याच्या धमकीवरून लाच घेण्याचा प्रयत्न करत होता. तक्रारीच्या आधारे, एफआयआर नोंदवण्यात आला आणि सापळा रचून अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.यापूर्वी ईडीच्या मदुराई सब-झोनल ऑफिसमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. डिसेंबर 2023 मध्ये, तामिळनाडू दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने ईडी अधिकारी अंकित तिवारी याला एकूण 51 लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेपैकी 20 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले होते.

New Delhi Pin Code
New Delhi Railway station
Flights to New Delhi
delhi.gov.in login
delhi is in which state? – quora
Is Delhi a state
New Delhi Map
New Delhi district