वरोरा :- चोरट्यांच्या टोळीसाठी कर्दनकाळ ठरलेल्या वरोरा पोलीस स्टेशनच्या डीबी (गुन्हे शोध) पथकाने पुन्हा एकदा आपल्या कर्तबगारीचा डंका वाजवला आहे. जिल्ह्याबाहेरून येऊन सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावून, त्यांना मुद्देमालासह गजाआड करणाऱ्या वरोरा डीबी पथकाला ‘उत्कृष्ट गुन्हा उकल २०२६’ या अत्यंत मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
💠 काय होती कामगिरी 💠
वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली होती. अत्यंत चलाखीने सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या या सराईत टोळीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, वरोरा डीबी पथकाने तंत्रज्ञान आणि खबऱ्यांचे जाळे वापरून या टोळीचा पर्दाफाश केला आणि आरोपींना जेरबंद केले.
💠 दिग्गज अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान 💠
या धाडसी कामगिरीबद्दल डीबी पथकाचे प्रमुख एपीआय शरद भस्मे आणि त्यांचे सहकारी अंमलदार मनोज ठाकरे, सौरभ कुलथे, नितीन रायपुरे व विशाल राजूरकर यांना चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वरोरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
🙏 स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टलची प्रतिक्रिया इ
जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचे वरोरा शहराला अभिमान आहे. ‘स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल’च्या वतीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!




