महाराष्ट्राला मिळणार 37 वा जिल्हा ? राज्य सरकारचा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होणार राज्य सरकारने २ एप्रिल २०२६ रोजी महसूल यंत्रणेच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यात खामगाव हा नवा जिल्हा निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकारने खामगाव येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले असून, यामुळे मुख्यालयाचा भार कमी होऊन कामकाजाचे विकेंद्रीकरण होणार आहे. याच निर्णयाचा भाग म्हणून मेहकर, सिंदखेडराजा आणि खामगाव तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी अनुक्रमे डोणगाव, साखरखेर्डा व लाखनवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचवून त्यांना स्थानिक पातळीवर सेवा पुरवणे हा यामागचा मुख्य उद्देश असून, या घडामोडींमुळे महाराष्ट्रात ३७ व्या जिल्ह्याच्या निर्मितीची चर्चा आता अधिक तीव्र झाली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




