वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
चंद्रपूर-नागपूर रोडवर अवैध देशी दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोठ्या प्रमाणावर दारूसाठा आणि वाहन असा एकूण ५ लाख १७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय? अ. क्र.433/2026 नुसार
दिनांक ३० मार्च २०२६ रोजी वरोरा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की, चंद्रपूर-नागपूर रोडवर एक पांढऱ्या रंगाची बोलेरो (क्रमांक MH 31 FC 1821) दुभाजकावर चढून उलटली आहे. या अपघातामुळे गाडीतील देशी दारूचे खोके रस्त्यावर विखुरले गेले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार यांच्या आदेशाने पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस कारवाई आणि जप्ती
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, बोलेरोमध्ये ‘देशी संत्रा’ आणि ‘टँगो पंच’ या ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा साठा मिळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार:
* देशी संत्रा: २४८० निपा (किंमत ८६,८०० रुपये)
* टँगो पंच: ८७० निपा (किंमत ३०,४५० रुपये)
* वाहन: बोलेरो गाडी (अंदाजे किंमत ४,००,००० रुपये)
असा एकूण ५,१७,२५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
🛑 आरोपी फरार 🛑
अपघात झाल्यानंतर पोलीस पोहचण्यापूर्वीच बोलेरो चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी याप्रकरणी दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला असून, रासायनिक परीक्षणासाठी नमुने गोळा करण्यात आले आहेत.मा. सोनटक्के साहेब यांच्या आदेशाने १) पी.यस आय.जाधव साहेब २) विककी करपे ३) ना. पो. कॉ. राजेश मोगरे ४) पो. कॉ. दत्ता थीटे यांनी कार्यवाही केली. व पुढील तपास चालू आहे. फरार आरोपींच्या व मुख्य आरोपीस तू देणे चालू असून सदर कारवाई कलम ६५(अ)(ई), ८३ मदाका अन्वये करण्यात आली असून, पोलीस आता फरार चालक आणि मालकाचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
🙏 जय विदर्भ 🙏




