वरोरा : – ✍️ अभिषेक किशोर भागडे
वरोरा : – भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीत आणि आगामी उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर वरोरा विधानसभा क्षेत्रात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी किशोर बावणे यांची ‘BLA 1 (विधानसभा प्रमुख)’ पदी नियुक्ती जाहीर केली आहे.
मतदार यादी पुनरीक्षण अभियानाची धुरा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात ‘मतदार याद्यांचे पुनरीक्षण’ अर्थात एसआयआर (SIR) अभियान राबविले जात आहे. या अत्यंत महत्त्वाच्या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी किशोर बावणे यांच्या अनुभवावर विश्वास टाकत त्यांच्याकडे वरोरा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या:
🛑मतदार नोंदणी: विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांचे अचूक पुनरीक्षण करणे.
🛑 बूथ सक्षमीकरण: जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक बूथवर BLA-2 च्या नियुक्त्या करणे.
🛑 संघटनात्मक समन्वय: नियुक्त्यांची माहिती प्रदेश कार्यालयाला सादर करून पक्षाची तळागाळातील बांधणी मजबूत करणे.
“आपण विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कामास पुरेसा वेळ देऊन आपल्या अनुभवाचा योग्य उपयोग कराल, असा मला विश्वास आहे,” अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे किशोर बावणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वरोरा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण
किशोर बावणे यांच्या निवडीबद्दल वरोरा आणि भद्रावती परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्ष कार्यात अधिक गती येईल आणि आगामी काळात संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




