Home Breaking News वराेरा नगरपरिषदेत ‘विषय क्र. २६’ वरून रणकंदन; भाजप गटनेते अक्षय भिवदरे आक्रमक!

वराेरा नगरपरिषदेत ‘विषय क्र. २६’ वरून रणकंदन; भाजप गटनेते अक्षय भिवदरे आक्रमक!

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 90; hdrForward: 6; shaking: 0.000000; highlight: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0000,0.0000; brp_del_sen: 0.0000,0.0000; delta:1; bokeh:1; ispap:1; papproctime: 2026:03:27 19:44:44; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 35;

वराेरा :- नगरपरिषदेच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचे चित्र दिसत आहे. १८ फेब्रुवारी २०२६ राेजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आलेल्या ‘विषय क्रमांक २६’ वरून आता वादंग निर्माण झाला असून, हा विषय स्थगित ठेवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा भाजप गटनेते अक्षय दिलीप भिवदरे यांनी दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत विषय क्रमांक २६ (बिलांशी संबंधित) मांडण्यात आला होता. मात्र, या विषयाला विरोधी पक्षातील १३ नगरसेवकांसह सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनीही कडाडून विरोध केला होता. या विरोधामुळे हा विषय स्थगित ठेवून पुढील सभेत फेरविचारासाठी ठेवण्याचा ठराव (ठराव क्र. २६) मंजूर करण्यात आला होता.
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
अक्षय भिवदरे यांनी आज मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. त्यात त्यांनी नमूद केले की, २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या पुढील सर्वसाधारण सभेत हा विषय पुन्हा विचारार्थ ठेवणे अपेक्षित होते, परंतु तसे करण्यात आले नाही. तसेच या विषयाबाबत कोणतीही स्पष्टता प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
प्रशासनाला इशारा आणि मागणी
भिवदरे यांनी पत्राद्वारे प्रशासनाला स्पष्ट ताकीद दिली आहे की:
* विषय क्र. २६ पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे स्थगित ठेवावा.
* या विषयाशी संबंधित कोणतीही बिले मंजूर किंवा अदा करू नयेत.
* जर याकडे दुर्लक्ष करून बिले काढली गेली, तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ स्तरावर तक्रार करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाईल.
* मागण्या मान्य न झाल्यास नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे 14 ही नगरसेवकांनी सांगितले व या निवेदनाच्या प्रती आमदार श्री. करण संजयजी देवतळे आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणावरून वरोरा शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता मुख्याधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा: ‘स्वतंत्र विदर्भ न्यूज’ पोर्टल,वरोरा

🙏 जय विदर्भ 🙏