Home जिल्हा जि. प. प्राथमिक शाळा नागरी येथे ‘माजी विद्यार्थी संघाची’ स्थापना; अध्यक्षपदी सुरज...

जि. प. प्राथमिक शाळा नागरी येथे ‘माजी विद्यार्थी संघाची’ स्थापना; अध्यक्षपदी सुरज धात्रक यांची निवड

नागरी :-येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘माजी विद्यार्थी संघाची’ मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. या नवनियुक्त कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सुरज प्रमोदराव धात्रक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, भौतिक सोयीसुविधांची पूर्तता करणे आणि शाळेच्या नावलौकिकात भर घालणे या मुख्य उद्देशाने हा संघ कार्यान्वित करण्यात आला आहे.
नवनियुक्त कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
अध्यक्ष :- सुरज प्रमोदराव धात्रक
उपाध्यक्ष :- अक्षय शरदराव भलमे
सचिव :- राजू तानबाजी बुरले
कोषाध्यक्ष :- अतुल नत्थूजी बुरले
सदस्य :- मंगेश किशोरराव भलमे, हितेंद्र स्वर्गवाणी, संदीप सुधाकरजी घुबडे, शितल उदयसिंग दीक्षित, नूतन गजानन पाटील
शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि शाळेच्या विविध भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आगामी काळात जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना या संघाशी जोडून घेण्यासाठी एक भव्य माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्याचा संकल्पही यावेळी सोडण्यात आला.
या उपक्रमामुळे शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार असून, गावातील शिक्षण प्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏