भद्रावती औद्योगिक विकासाला नवे बळ भद्रावती तालुक्यातील औद्योगिक प्रगतीच्या दिशेने आज मोठे पाऊल टाकण्यात आले. न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन आणि ग्रेटा एनर्जी लिमिटेड या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक प्रकल्पांचे भूमिपूजन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री कोळसा व खान जी किशन रेड्डी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे भद्रावतीच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री डॉ. अशोकजी उईके, राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराजभैया अहीर, खासदार प्रतिभाताई धनोरकर, आमदार करणभाऊ देवतळे, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार देवरावजी भोंगळे, जिल्हाधिकारी विनयजी गौडा, पोलीस अधीक्षक मुम्मुकाजी सुदर्शन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध विभागांचे अधिकारी व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थितहोते.भद्रावतीजवळील तेलवासा येथे उभारण्यात येणारा न्यू एरा क्लीनटेक कंपनीचा कोळसा गॅसिफिकेशन (कोळसा ते केमिकल) प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोळशापासून विविध औद्योगिक उत्पादने तयार केली जाणार असून यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. याचबरोबर ग्रेटा एनर्जी लिमिटेड कंपनीचा ग्रीनफिल्ड प्रकल्पही येथे उभारला जाणार असून या दोन्ही प्रकल्पांमुळे भद्रावती परिसरातील औद्योगिक विकासाला नवे बळ मिळेल.विशेष म्हणजे, २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात या सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. आता या प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत असल्याने भद्रावतीच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.या प्रकल्पांमुळे परिसरातील उद्योगधंद्यांना गती मिळणार असून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्या मुळे भद्रावती शहर औद्योगिक नकाशावर अधिक भक्कमपणे उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
🙏जय विदर्भ🙏🏻




