Home जिल्हा लोकमान्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर; युवकांनी दाखवला मानवतेचा आदर्श

लोकमान्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर; युवकांनी दाखवला मानवतेचा आदर्श

 

वरोरा : समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत युवकांनी रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देत प्रेरणादायी उपक्रम राबविला. लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवाशक्ती विचार मंच व डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून अनेक विद्यार्थ्यांनी व युवकांनी पुढाकार घेत समाजासाठी योगदान दिले. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. लोकमान्य महाविद्यालय नेहमी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठेवणारी कार्यक्रम घेत असते ही संस्था अनेक वर्षापासून संस्कृती जतन करणारी आहे.

कार्यक्रमाला लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथील प्रभारी प्राचार्य जयश्री शास्त्री मॅडम, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे पी.आर.ओ. अमित तुपे सर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. रवींद्र शेंडे सर, डॉ. पुरी सर उपस्थित होते. तसेच युवाशक्ती विचार मंचचे अध्यक्ष गणेश नक्षीने, उपाध्यक्ष शकील शेख, सचिव लोकेश रुयारकर, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, रोहित घाटे, युवराज शेंडे, भूषण भटारकर, अंकित समर्थ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी युवकांना रक्तदानाचे महत्त्व सांगत अशा सामाजिक कार्यात नेहमी पुढे येण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक जाणीव वाढून समाजसेवेची प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

🙏जय विदर्भ🙏