Home क्राईम रेतीघाटावरील पैशांच्या वादातून हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी तलवारी-दांड्यांनी मारहाण; चार वाहनांची...

रेतीघाटावरील पैशांच्या वादातून हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी तलवारी-दांड्यांनी मारहाण; चार वाहनांची तोडफोड, पोकलेन जाळली, तिघांना अटक

 

वरोरा (चंद्रपूर) :
चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या बामडा रेतीघाटावर पैशांच्या वादातून झालेल्या भीषण हल्ल्यात भारतीय जनता पक्षाचे पुलगाव शहर महामंत्री भरत दयानंद नागपाल (वय ४२, रा. पुलगाव, जि. वर्धा) यांची तलवार व दांडक्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून 1 मार्च रोजी रात्री सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

या हल्ल्यानंतर संतप्त जमावाने चार वाहनांची तोडफोड केली तसेच एक पोकलेन मशीन पेटवून दिली. जखमींमध्ये पंकज वानखेडे व अनिल ठोंबरे ( दोघेही रा. पुलगाव, जि. वर्धा) यांचा समावेश आहे.

माहितीनुसार, गितेश सातपुते यांनी शासनाकडून बामर्डी रेतीघाट दोन वर्षांसाठी लिलावात घेतला होता. घाट पंकज वानखेडे, अनिल ठोंबरे, भरत नागपाल घेतला होता. संबंधितांनी त्यापैकी काही रक्कम सातपुते यांच्या खात्यात जमा करून रेतीउपसा सुरू केला होता. सातपुते यांच्याकडे घाटाची मुदत जून 2026 पर्यंत होती. जानेवारी रोजी घाट परत घेत उर्वरित फेब्रुवारीत परत देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र वारंवार संपर्क करूनही रक्कम परत न मिळाल्याने वानखेडे व सहकारी रक्कम मागण्यासाठी घाटावर गेले होते.

यावेळी दोन्ही गटांमध्ये वाद होऊन आरोपींनी तलवार व दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात भरत नागपाल यांचा मृत्यू झाला, तर पंकज वानखेडे व अनिल ठोंबरे गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी वरोरा पोलिस ठाण्यात अन्य कलमा द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

हल्ल्यानंतर आरोपीं च्या वाहनांची तोडफोड केली तसेच घाटावरील पोकलेन मशीन पेटवून मोठे आर्थिक नुकसान केले.

घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे पथक तपासात सहभागी असून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप बाकाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी दिली.

मृतक भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी भरत दयानंद नागपाल हे पुलगाव येथील नगरसेविका राज नागपाल यांचे सुपुत्र होते. २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला होता. शहरात लावलेल्या वाढदिवसाच्या फलकांमुळे ते चर्चेत होते. अवघ्या तीन दिवसांत त्यांची हत्या झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

🙏जय विदर्भ🙏🏻