वरोरा : अभिषेक भागडे
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर तसेच चंद्रपूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षण शिबीर व सत्कार सोहळा वरोरा येथील स्व. दादासाहेब देवतळे सभागृह (शेतकरी भवन) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला सहकार व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थितांमध्ये मा. हंसराजजी भैया अहिर साहेब, करनदादा देवतळे, प्रतिभाताई धानोरकर, बंटीभाऊ भांगडिया, रवींद्रजी शिंदे, डॉ. विजयजी देवतळे, मा. प्रकाशजी मुथा, संजयजी डोंगरे, राजेश्वरजी कल्याणकर, नंदाताई अल्लूरवार, जयंतजी टेमुर्डे, दिनेशजी चोखारे, राजुभाऊ टोंगे आदी मान्यवरांचा समावेश होता.
या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक व परिणामकारक बनवणे हा होता. सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद यांना आधुनिक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, नियमपालन तसेच कार्यक्षम प्रशासन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण सत्रात विविध उदाहरणांद्वारे सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारप्राप्त मान्यवरांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. त्यांच्या कार्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, सहकारातूनच ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळू शकते. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रामाणिकपणा व पारदर्शकता जपली तर सहकार चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक संस्थांचे कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवर, प्रशिक्षणार्थी व नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
🙏जय विदर्भ🙏
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




