चंद्रपूर :- अभिषेक भागडे
महानगरपालिकेतील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी अधिकृतरित्या एकत्र येत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी पूर्ण केली. या प्रक्रियेदरम्यान राजेश अडूर यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी अधिकृत नोंद करण्यात आली. या घडामोडीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये आता सर्व काही सुरळीत असून कोणताही वेगळा गट अस्तित्वात नसल्याचा दावा पक्षाने केला आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेत सर्व २७ नगरसेवक हे एकसंघपणे काँग्रेसच्या गटात असून येत्या १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
🙏जय विदर्भ🙏
☎️ 9673574711
☎️8329889732




