वचनपूर्तीची सुरुवात! कामातून विश्वास जिंकणारे नेतृत्व
वरोरा : – अभिषेक भागडे
नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सीमा सचिन तडस यांनी पदभार स्वीकारताच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली असून, त्यांच्या तत्पर आणि प्रभावी नेतृत्वामुळे परिसरातील अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागल्या आहेत. “आम्ही फक्त आश्वासन देत नाही, काम करून दाखवतो,” हा त्यांचा ठोस संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे.
परिसरातील नागरिकांना अंधाराचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत माणिक कुरसंगे व संजय वानखेडे यांच्या घराजवळ नवीन लाईट फिटिंगचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना सुरक्षिततेचा मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच बंगाली कॅम्पजवळील शिव मंदिर परिसरात बंद अवस्थेत असलेल्या बोरवेलचे दुरुस्तीकरण करण्यात आले असून, त्या ठिकाणी नवीन लाईटही बसवण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा व प्रकाश व्यवस्था या दोन्ही महत्त्वाच्या समस्या एकाच वेळी सोडवण्यात आल्या.
याचबरोबर गव्हर्मेंट टॉयलेट परिसरात तसेच श्री. दारवणकर व श्री. घोडमारे यांच्या घरासमोरील लाईट फिटिंग करण्यात आली आहे. या कामांमुळे सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता वाढली असून महिलांसह सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरसेविका सौ. सीमा सचिन तडस यांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, “काम बोलतेय” अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ शब्दांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामावर भर देणारे हे नेतृत्व भविष्यातही विकासाच्या दिशेने नवे पाऊल टाकेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
🙏जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




