Home जिल्हा ⭕🙏 वरोरा येथील माजी नगरसेवक स्व. दादाजी बापूरावजी भिवदरे यांचे दुखद निधन...

⭕🙏 वरोरा येथील माजी नगरसेवक स्व. दादाजी बापूरावजी भिवदरे यांचे दुखद निधन 🙏⭕

वरोरा येथील माजी नगरसेवक स्व. दादाजी बापूरावजी भिवदरे यांचे दुःखद निधन

वरोरा : – अभिषेक भागडे

वरोरा शहरातील माजी नगरसेवक तसेच भाजीपाला ठोक विक्रेते स्व. दादाजी बापूरावजी भिवदरे (वय ८३) यांचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वरोरा शहरातील सामाजिक व व्यापारी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्व. दादाजी भिवदरे हे अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. सामान्य जनतेशी आपुलकीने वागणारे, नेहमी मदतीस तत्पर असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. नगरसेवक म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य केले.

त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार, दिनांक ०६/०२/२०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता वरोरा येथे करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट व मोठा मित्रपरिवार आहे.
स्व. दादाजी भिवदरे यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🙏🏻जय विदर्भ🙏🏻

बातमी जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️9673574711
☎️ 8329889732