Home जिल्हा ⭕🙏 लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात निरोप समारंभातून भविष्याची दिशा ठरणारा ठोस संदेश 🙏⭕

⭕🙏 लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात निरोप समारंभातून भविष्याची दिशा ठरणारा ठोस संदेश 🙏⭕

लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात निरोप समारंभातून भविष्याची दिशा ठरवणारा ठोस संदेश!

वरोरा :- अभिषेक भागडे

लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित निरोप समारंभ हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिशा देणारा, विचारांना चालना देणारा आणि आत्मविश्वास जागवणारा ठरला. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. स्वरूप भागडे यांनी सायबर सुरक्षा, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना सडेतोड आणि प्रभावी मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात संधींसोबत धोकेही वाढत असल्याचे स्पष्ट करत, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सुरक्षिततेचे भान ठेवण्याचा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

भाषणानंतर अनेक विद्यार्थ्यांनी श्री. भागडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन future planning, career opportunities आणि technology संदर्भात सखोल चर्चा केली. यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ निरोप न राहता करिअरची दिशा ठरवणारा टर्निंग पॉइंट ठरल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी जोशी सरांनी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि व्यावहारिक मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना यशासाठी शिस्त, सातत्य आणि नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. तर खुले सरांनी प्रेरणादायी विचार मांडत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढील वाटचाल करण्याचा संदेश दिला.

शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता करण्यात आली. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा, जिद्द आणि भविष्याबाबत स्पष्ट दृष्टी निर्माण करणारा ठरला, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

🙏 जय विदर्भ 🙏