आनंदवन शाळेत गणराज्य दिनानिमित्त संस्कृतीक कार्यक्रम उत्साहात संपन्न
वरोरा : – अभिषेक किशोरराव भागडे
तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद आनंदवन शाळेत गणराज्य दिनाचे औचित्य साधून भव्य संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दुपारी ३ ते ६ या वेळेत रंगला असून विद्यार्थ्यांच्या विविध कलात्मक सादरीकरणांनी वातावरण देशभक्तीने भारावून गेले.
यापूर्वी, दुपारी १२ वाजता आमदार करण देवतळे यांनी शाळेला भेट देऊन अॅस्ट्रॉनॉमी लॅबची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेसाठी संरक्षण भिंत आणि शौचालय बांधून देण्याची घोषणा केली. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक नगाजी साळवे यांनी आमदार देवतळे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी आनंदवनचे विश्वस्त दुधाकर कडू उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात संस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत बोथले, सदस्य हेमने, हुजूर शेंडे, ठाकरे, तसेच प्रवीण बदकी आणि प्रमोद नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नगाजी साळवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुरसकर, चिकटे, अमोल आवारी, आदित्य डेव्ह, गायकवाड, ढवस, अनामिका आत्राम, कु. बंदुकवार, भोयर, शेटे आणि माधुरीबाई यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्ये आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय बांदूरकर यांनी केले.
या कार्यक्रमाला पालक, शिक्षकवर्ग आणि स्थानिक मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. संपूर्ण शाळा परिसरात गणराज्य दिनाचा उत्साह, अभिमान आणि संस्कृतीचा आनंद दुमदुमत होता.
🙏🏻जय विदर्भ🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711
☎️ 8329889732




