Home जिल्हा ⭕🙏 रेल्वे सिमेंट चोरी प्रकरणात वरोरा पोलिसांकडून कारवाई 🙏⭕

⭕🙏 रेल्वे सिमेंट चोरी प्रकरणात वरोरा पोलिसांकडून कारवाई 🙏⭕

 

२४ तासांत आरोपी अटक; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

वरोरा  : – अभिषेक किशोरराव भागडे

वरोरा शहरातील वणी रोडवरील उड्डाण पुलाजवळ रेल्वेच्या कामासाठी आणलेले सिमेंट चोरीस गेल्याची घटना १ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी अतिशय तत्परतेने कारवाई करत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी राहुलकुमार नुनबाबु रजत धंदा (खाजगी नोकरी, रा. रुपनगर, बिहार) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रेल्वेच्या सुरू असलेल्या कामासाठी वणी बायपास उड्डाण पुलाखाली, रेल्वे ट्रॅकजवळ ठेवलेले ८५ पोते सिमेंट (अंदाजे किंमत २९,००० रुपये) रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले होते. या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा नोंद होताच सपोनि शरद एस. भस्मे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा संदीप मुळे (ब.न. २५७१), पोका विशाल राजुरकर (ब.न. ०१), पोअं सौरभ कुलथे (ब.न. १०५३), पोहवा सुकराज यादव (ब.न. ७११) व पोहवा नवघरे (ब.न. ९२४) यांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी व चोरीसाठी वापरलेल्या वाहनाचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान संशयित गाडीचा चालक  कालिदास वाकडे (वय ४२, रा. टेमुर्डा) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याला आरोपीने सिमेंट भरायला लावल्याचे कबुली दिली. पोलिसांनी चोरी गेलेले सुमारे १०० पोते सिमेंट (किंमत अंदाजे ३०,००० रुपये) तसेच चोरीसाठी वापरलेले बुलेरो पिकअप वाहन (किंमत अंदाजे ४ लाख रुपये) जप्त केले. एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. सूचना पत्रावर चालकाला सोडण्यात आले असून मुख्य आरोपी अजून ही फरार आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल (वरोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडली.

वरोरा पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे रेल्वे सिमेंट चोरी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश झाला असून, पोलिसांच्या दक्षतेचे व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🙏जय विदर्भ 🙏

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क साधा.

☎️ 9673574711

☎️8329889732