Home विदर्भ ⭕🙏 मुल येथे अभिष्टचिंतन व जनसेवक सन्मान सोहळा 🙏⭕

⭕🙏 मुल येथे अभिष्टचिंतन व जनसेवक सन्मान सोहळा 🙏⭕

 

“अभिष्टचिंतन व जनसेवक सन्मान सोहळा” ३ फेब्रुवारीला मूल येथे

मूल :- अभिषेक किशोर भागडे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तसेच जनसेवक सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरीत करण्यात आले आहे.

या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई – चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा शाखा तसेच दोन्ही जिल्ह्यांतील सर्व तालुका शाखा पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष तथा दैनिकाचे ज्येष्ठ व अनुभवी संपादक निलेश सोमाणी हे लाभणार असून, सहअध्यक्ष म्हणून मूल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ऐकताताई समर्थ उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले व मूल उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून

डॉ. बंडू रामटेके – वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर

आ. स्वप्निल मरस्कोले – विभागीय व्यवस्थापक (FDCM), बल्लारपूर

आ. मृदुला मोटे – तहसीलदार, मूल

आ. संदीप दोडे – मुख्याधिकारी, नगर परिषद मूल

यांची उपस्थिती लाभणार आहे.

विशेष उपस्थिती म्हणून
प्रकाश देवतळे (प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघ),
प्रा. महेश पानसे (प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई),
अनूपकुमार भागर्व (ज्येष्ठ संपादक तथा विदर्भ अध्यक्ष),
राकेश रत्नावर (उपाध्यक्ष, नगर परिषद मूल)
हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सतत झटणारे, समाजातील अन्याय व प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणारे तसेच निःस्वार्थ भावनेने जनतेच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील सत्यनिष्ठ जनसेवकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा जनसेवक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे आयोजकांनी सांगितले.

हा कार्यक्रम दुपारी १२.०० वाजता सुरू होणार असून,
स्थळ : माता दुर्गा मंदिर सभागृह, चंद्रपूर रोड, मूल, जि. चंद्रपूर
असे आहे. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्यास सर्व मान्यवर, आमंत्रित, पत्रकार बांधव व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

🙏जय विदर्भ🙏

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:
📞 9673574711
📞 8329889732