स्व. जमनाबाई तान्याबापू उमरे फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
वरोरा | प्रतिनिधी : अरुण उमरे
तालुक्यातील अकोला नं.१ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व. जमनाबाई तान्याबापू उमरे फाउंडेशनच्या वतीने अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष शामदेवराव उमरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष गजानन शामदेव उमरे, प्रतिभा उमरे, अरुण उमरे, सिताबाई उमरे, सदाशिव उमरे, भगवान उमरे, माजी सैनिक गजानन उमरे, नारायण गाढवे, शामराव मटाले, भास्कर चवले, अल्का धुर्वे, भागीरथा उमरे, पंढरी बुटके, चिंतामण बुटके, भाऊराव भोगेकर, बापूराव गाढवे, विठ्ठल पुसाम, छाया भैयाजी उमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन २०१४ मध्ये कोरपना तालुक्यातील हेटी येथील शाळेच्या सुवर्ण जयंती महोत्सव तसेच नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून, शाळेचे माजी मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या — स्व. तान्याबापू उमरे व स्व. जमनाबाई उमरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या फाउंडेशनची स्थापना केली. स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे.
थोराणा येथे बदली असताना तसेच कोरोना काळात सोनुबाई येवले यांच्या आश्रमातही विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. सध्या उमरे यांची बदली त्यांच्या जन्मगावी झाल्याने, अखेरपर्यंत स्वगावीच सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला.
या उपक्रमाअंतर्गत अकोला नं.१ येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अरुण उमरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन उमरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश उमरे, अनिकेत चवले, आशिष उईके, आदित्य जुनघरे, सार्थक उमरे, भैरव उमरे, यश उमरे, युवराज भोगेकर, पवन घानोडे, मारोती घानोडे, रोशन उमरे, अनिल सावसाकडे, अतुल सावसाकडे, अनंता बुटके आदींनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ 🙏
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
☎️ 9673574711
☎️ 8329889732




