Home जिल्हा ⭕🙏 वरोरा भव्य मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर रोग निदानशिबीराचे आयोजन 🙏⭕

⭕🙏 वरोरा भव्य मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर रोग निदानशिबीराचे आयोजन 🙏⭕

वरोरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर रोगनिदान शिबिराचे आयोजन

वरोरा : – अभिषेक किशोरराव भागडे

रोटरी क्लब वरोरा, इनरव्हील क्लब वरोरा आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून हे शिबिर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
स्थळ – डॉ. विवेकजी तेला हॉस्पिटल, श्रीमती इंदिरा गांधी रोड, वरोरा येथे पार पडणार आहे.

शिबिरात नागरिकांसाठी पूर्णतः मोफत खालील तपासण्या करण्यात येणार आहेत –
रक्त तपासणी, रक्तदाब (BP) तपासणी, मधुमेह (शुगर) तपासणी, यकृत व किडनी तपासणी, कावीळ तपासणी, तोंडाचे आजार, थायरॉईड व स्तनांचे आजार, HIV तपासणी तसेच महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित आजारांची तपासणी.

या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉ. विवेकजी तेला असून रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष श्री. योगेश एन. डोंगरवार आणि इनरव्हील क्लब वरोराच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता यो. डोंगरवार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे वेळेवर निदान व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ वरोरा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोफत तपासणीसाठी संपर्क : ९८६०४६४८०१

-🙏 जय विदर्भ🙏-
बातमी जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711
☎️8329889732