Home महाराष्ट्र ⭕🙏 वरोरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा, अजितदादा पवारांना आदरांजली 🙏⭕

⭕🙏 वरोरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा, अजितदादा पवारांना आदरांजली 🙏⭕

वरोरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा; अजित दादा पवारांना आदरांजली

वरोरा : -अभिषेक किशोरराव भागडे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर वरोरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून पक्षभेद विसरून मानवतेचा धर्म जपण्याचा संदेश समाजाला देण्यात आला.

या श्रद्धांजली सभेला चंद्रपूर क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा–भद्रावती मतदारसंघाचे आमदार करण दादा देवतळे, वरोरा नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अजित दादा पवार यांच्या कार्यशैलीचे, नेतृत्वगुणांचे तसेच जनसामान्यांशी असलेल्या नात्याचे स्मरण केले. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील अनेक किस्से व प्रसंग सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना अखेरचा निरोप दिला. सर्वपक्षीय एकतेचे दर्शन घडवणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
🙏जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711☎️8329889732