बारामतीत कराटेच्या मैदानावर वरोराची दणदणीत गर्जना — वेदिका भोयरची रजतपदकावर झेप!
वरोरा :- अभिषेक किशोर राव भागडे
बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या ६९ व्या राष्ट्रीय कराटे शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२०२६ मध्ये वरोराच्या खेळाडूने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत प्रतिस्पर्ध्यांना थेट आव्हान दिले. फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट सेंटर, वरोरा तसेच आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा ची विद्यार्थीनी वेदिका गुणवंत भोयर हिने आपल्या जबरदस्त, आक्रमक आणि नेत्रदीपक खेळाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावत रजत पदकावर कब्जा केला.
स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत वेदिकाने आत्मविश्वास, वेग आणि तांत्रिक कौशल्य यांचा अचूक संगम दाखवत प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चीत केले. तिच्या लढतीत दिसलेली जिद्द आणि धारदार तंत्र पाहून उपस्थित प्रेक्षकांनीही जोरदार दाद दिली. वरोराच्या मार्शल आर्ट परंपरेचा झेंडा तिने राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.
या दणदणीत यशाबद्दल श्री. विनय बोडे (अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक, जुनसेई शोतोकन कराटे असोसिएशन, भारत),
मुख्य प्रशिक्षक रवी चरूरकर,
अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. प्रविण चिमुरकर (बी.एस.एफ.),
समन्वयक श्री. डी. एन. खापने सर (भा. वायू सेना),
सचिव श्री. रवि तुराणकर,
हेमराज बेहरे सर (भा. स्थल सेना),
गुरुवर्य राजू नकवेजी,
मास्टर वैभव खारकर, घनश्याम खोंडे तसेच शहरातील मार्शल आर्ट क्रीडाप्रेमी वर्ग यांनी वेदिकेवर कौतुकाचा वर्षाव केला.
आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि पालकवर्ग यांनीही वेदिकेच्या या झंझावाती कामगिरीचे जोरदार अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
वरोराची कराटे शक्ती पुन्हा सिद्ध — वेदिकेच्या रौप्य झेपेमुळे क्रीडा विश्वात नवा आत्मविश्वास.
🙏जय विदर्भ🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा☎️ 9673574711 ☎️ 8329889732




