Home Breaking News ⭕🙏 अवकाशातून कोसळले स्वप्न…. महाराष्ट्र हादरला विमान अपघातात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित...

⭕🙏 अवकाशातून कोसळले स्वप्न…. महाराष्ट्र हादरला विमान अपघातात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू,भावपूर्ण श्रद्धांजली🙏⭕

🕯️ आकाशातून कोसळले स्वप्न… महाराष्ट्र हादरला!
✈️ विमान अपघातातील मृतांना स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

वरोरा :- अभिषेक भागडे

राज्यातील जनतेच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या दुर्दैवी घटनेत 5 निष्पाप कार्यकर्ते मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून त्यात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा समावेश होता. एकूण 6 लोक अपघातस्थळी आगीचे लोळ आणि धुराचे ढग पाहून काळीज पिळवटून टाकणारे दृश्य होते.

ही घटना केवळ अपघात नसून, नागरी विमान वाहतूक व्यवस्थेच्या ढिसाळपणावर उघड झालेला काळा डाग असल्याचे संतप्त नागरिकांमधून बोलले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा गवगवा करणाऱ्या यंत्रणांकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे इतके दुर्लक्ष का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली, तरी “अपघातानंतर मदत नव्हे, अपघातच टाळण्याची जबाबदारी कुणाची?” हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. डीजीसीए, विमान कंपनी आणि संबंधित यंत्रणांची सखोल, पारदर्शक व निष्पक्ष चौकशी तातडीने व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या सर्व मृतांना
🕯️ स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️

शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय हा आवाज थांबणार नाही!
निष्पापांचे प्राण स्वस्त नाहीत—हे प्रशासनाने कायम लक्षात ठेवावे.

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली…
✊ सुरक्षिततेसाठी लढा सुरूच राहील!

🙏🏻जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.☎️ 8329889732
☎️ 9673574711