वरोऱ्यात वीर सावरकर चौकात देशभक्तीचा जाज्वल्य हुंकार!
ऑटो चालक-मालक व पान टपरी संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा
वरोरा : अभिषेक भागडे
देशाच्या सार्वभौमत्वाचा, लोकशाही मूल्यांचा आणि संविधानाच्या गौरवाचा प्रजासत्ताक दिन वरोरा येथील वीर सावरकर चौकात ऑटो चालक-मालक संघटना व पान टपरी संघटनेच्या पुढाकारातून अत्यंत उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमाला वरोरा–भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार करणदादा देवतळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या सोबत नगरसेवक व शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, भाजपा नगरसेवक गणेश भिवदरे गटनेते , तसेच शिवसेना (शिंदे गट) चे नव निर्वाचित नगरसेवक खेमराज भाऊ कुरेकार, लताताई हिवरकर, शंभुनाथ वरर्गणे, दीपक घुडे, पराग सुकुरवार, सुनील भाऊ नक्षीने, मारुती कुत्तरमारे, बंटी चौधरी, अमित घुडे, संदीप भाऊ दीडमीशे, स्वप्निल देवळकर, दिलीप घोरपडे आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना बिस्किटे व चॉकलेटचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. यावेळी आमदार करणदादा देवतळे यांनी आपल्या ओजस्वी व प्रेरणादायी मनोगतातून 26 जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व उलगडून सांगत, संविधान, लोकशाही व राष्ट्रीय एकतेचे मोल विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले.
“देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. संविधानाचा सन्मान राखून राष्ट्रउभारणीसाठी कटिबद्ध रहा,” असे ठाम आवाहन त्यांनी केले.उल्हास दांडेकर दशरथ ताजने अरविंदा भोयर माकुलकर भाऊ सचिन सोजलवार प्रकाश पारेलवार व मित्रपरिवार उपस्थित होता वीर सावरकर चौकात देशभक्तीची ऊर्जा, राष्ट्रप्रेमाचा अभिमान आणि सामाजिक एकतेचा संदेश देत प्रजासत्ताक दिनाला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण स्वरूप दिले. 🇮🇳🔥
🙏🏻 जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




