⭕🙏 वरोरा नगरपरिषदेतील जलशुद्धीकरण प्रकल्पात गंभीर गैरव्यवस्थापन🙏⭕

🚨 वरोरा नगरपरिषदेतील जलशुद्धीकरण प्रकल्पात गंभीर गैरव्यवस्थापन!

संपवेल पंप हाऊसचे काम अपूर्णच — नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ

वरोरा : अभिषेक भागडे

वरोरा नगरपरिषद अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राजवळील संपवेल पंप हाऊस व टाकी पंप हाऊस येथील कामे महिन्यांपासून अपूर्ण असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर कामासाठी मोठा निधी मंजूर होऊनही कंत्राटदाराकडून कामात प्रचंड हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकल्पात ५० HP व ४० HP क्षमतेचे नवीन पंप, पाईपलाईन फिटिंग, तसेच २ लाख लिटर क्षमतेच्या टाकीतील कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात आली आहे.

या निष्काळजीपणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, दूषित पाणीपुरवठ्याचा धोका वाढला आहे. नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील साटेलोटे तर नाही ना, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. याकरिता भारतीय जनता पार्टीचे व शिवसेना शिंदे गट अधिक आक्रमक होत आहे

या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने स्थळ तपासणी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदार नेमावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. नियमांनुसार काम पूर्ण न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

जर प्रशासनाने याप्रकरणी ताबडतोब ठोस निर्णय घेतला नाही, तर नागरिक आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा गटनेते गणेश भिवदरे, नगरसेवक खेमराज कुरेकर, कुणाल रुयारकर,( शिवसेना शिंदे गट ) संतोष पवार,शंभुनाथ वरर्गने, प्रवीण चिमूरकर,सीमा तडस, नलिनी आत्राम, नुपूर तेला, वर्षा पिसाळ, लीना गयनेवार, मनीषा दानव, लता हिवरकर, आशा आसेकर उपस्थित होते.

जय विदर्भ
बातमी व जाहीरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732