श्री कल्यानेश्वर गणेश देवस्थानतर्फे प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती उत्सव उत्साहात
कॅन्सर निदान शिबीर, मार्गदर्शन व नगरसेवक–गुणवंतांचा भव्य सन्मान
वरोरा : ✍️ अभिषेक भागडे
श्री कल्यानेश्वर गणेश देवस्थान यांच्या वतीने, स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था व नगरसेविका मनिषा संजय दानव यांच्या सहकार्याने श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे भक्तिभावपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या मंगलप्रसंगी वरोरा नगर परिषदेतील सर्व पक्षीय नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नगरसेविका मनिषा संजय दानव यांच्या पुढाकारातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग (जिल्हा परिषद, चंद्रपूर) व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था व कल्यानेश्वर गणेश देवस्थान यांच्या सहकार्याने कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. हा उपक्रम आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शिबिराचे उद्घाटन भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉ. सागर वझे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे दंतचिकित्सक डॉ. प्रवीण केशवाणी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश उमरे, मोबाईल कर्करोग निदान शिबिराचे समन्वयक गणेश मडावी, संस्थेचे अध्यक्ष मारोती घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, संस्थापक सचिव आशिष घुमे तसेच संस्थेचे व देवस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात एकूण ८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ रुग्णांमध्ये कॅन्सरचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित रुग्णांना पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे बोलावण्यात आले आहे. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. समाजातील एकोप्याची भावना दृढ करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.
सायंकाळी शहरातील सर्व पक्षीय नगरसेवक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, डॉ. सागर वझे, बाबासाहेब भागडे, डॉ. अंकुश आगलावे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक खेमराज कुरेकार, बंडू देऊळकर, गजानन जिवतोडे, राज खंडारे, कुणाल रुयारकर, प्रवीण चिमुरकर, अभय ठावरी, मनिषा दानव, नलिनी आत्राम, अक्षय भिवदरे, संतोष पवार, सीमा तडस, मनीष जेठानी, योगिता नेरकर, राहुल देवडे, स्वीकृत नगरसेवक शंभूनाथ वरघणे, आशा आसेकर, मंगला पिंपळकर, रेखा तेलतूमडे आदींचा वॉर्डातील नागरिकांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच वॉर्डातील उर्वशी सुधाकर सोयाम हिची बीएएमएससाठी निवड झाल्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. दहावी परीक्षेत ७५ टक्के गुण मिळविल्याबद्दल अलफिया फिरोज शेख, महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल राशी विनेशचंद्र मांडवकर, तसेच शालेय महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सुष्टी मोहन चट्टे यांचा गौरव करण्यात आला. यासह आयुषी प्रशांत टापरे हिची बीपीटी (फिजिओथेरपी) शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार करण देवतळे व त्यांच्या सौभाग्यवती वेदांती देवतळे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आशिष घुमे यांनी केले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी छाया चव्हाण, ज्योती किटे, प्रशांत साळवे, सुनील इंगळे, सूर्यभान मडावी, सागर आत्राम, आदेश किन्नाके, फिरोज शेख, प्रभाकर आत्राम, संतोष पवार, नूतन बुरडकर, सुधाकर सोयाम, सचिन ढवळे, मनोज अंडरस्कर, उमेश घुमडे, सुहास दांडेकर, रुपेश पचारे, सार्थक नागपुरे, प्रीतम किटे आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.
धार्मिक श्रद्धा व सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम वरोऱ्यातील नागरिकांच्या मनात कायम स्मरणीय ठरला असून, आयोजकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
🙏🏻 जय विदर्भ🙏🏻
बातमी व जाहिराती साठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




