पावना (ता. भद्रावती) येथे भव्य पुरुषांचे कबड्डी सामने; ‘माजी सरपंच चषक’ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
पावना :- अभिषेक भागडे
पावना (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) येथे ‘माजी सरपंच चषक’ पुरुषांची भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडणार असून, या स्पर्धेचे आयोजन प्रदीपभाऊ घागी यांच्या संकल्पनेतून व नोमान कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली न्यू जनचेतना क्रिडा मंडळ, पावना (रे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शनिवार, दि. 24 जानेवारी 2026 रोजी समीर खान यांच्या भव्य मैदानावर, पावना (रे) येथे आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे व कबड्डी या पारंपरिक खेळाला चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत 45 किलो वजन गटातील सामने खेळविण्यात येणार असून, प्रवेश फी 500 रुपये तर तक्रार फी 900 रुपये ठेवण्यात आली आहे. विजेत्या संघासाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून,
प्रथम पारितोषिक ₹7000,
द्वितीय ₹5000,
तृतीय ₹3000,
चतुर्थ ₹2000 व
पाचवे ₹1000 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक विजेत्या संघाला चषक व गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, कार्यकर्ते व पंच परिश्रम घेत असून, पंच, समालोचक व व्यवस्थापनाची भक्कम व्यवस्था करण्यात आली आहे. क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक कबड्डी सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
🙏🏼जय विदर्भ🙏
बातमी जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




