⭕🙏 नवनिर्वाचित नगरसेवक गणेश दिलीप भिवदरे यांच्या कार्याची सुरुवात 🙏⭕

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 90; hdrForward: 6; shaking: 0.000000; highlight: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0000,0.0000; brp_del_sen: 0.0000,0.0000; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 25;

नव निर्वाचित नगरसेवक गणेश भीवदरे यांच्या कार्याची दमदार सुरुवात; दोन वर्षांपासून भरलेला मुख्य नाला अखेर मोकळा

वरोरा :- अभिषेक भागडे

प्रभाग क्रमांक ६ चे नव निर्वाचित नगरसेवक गणेश दिलीप भीवदरे यांनी पदभार स्वीकारताच जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत आपल्या कार्याची प्रभावी सुरुवात केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले वार्डातील गेल्या तब्बल दोन वर्षांपासून भरलेला व दुर्लक्षित राहिलेला मुख्य नाला अखेर साफसफाई व खोलीकरण करून मोकळा करण्यात आला आहे.

या नाल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे गटनेते व नगरसेवक गणेश भीवदरे यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. नव निर्वाचित नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्याशी मोबाईलद्वारे थेट संपर्क साधत त्यांनी ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

नगराध्यक्षा सौ. अर्चना ठाकरे यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर नाल्याचे खोलीकरण करून साचलेली घाण, कचरा व गाळ काढून नाला पूर्णतः साफ करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

नगरसेवक गणेश भीवदरे यांच्या या तत्पर व लोकाभिमुख कार्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. “निवडणूक संपताच कामाला सुरुवात करणारे नगरसेवक मिळाले, ही आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशाच प्रकारे विकासकामे सुरू राहावीत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या हितासाठी नेहमीच सक्रिय राहून प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार नगरसेवक भीवदरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल तर्फे नव निर्वाचित नगरसेवक गणेश दिलीप भीवदरे यांचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

🙏🏼 जय विदर्भ 🙏🏼
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️-9673574711
☎️-8329889732