✴️🙏⭕ वरोऱ्यात भव्य कॅन्सर रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ⭕🙏✴️

वरोऱ्यात भव्य मोफत कॅन्सर रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

वरोरा :- अभिषेक भागडे

समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उदात्त हेतूने वरोरा येथे भव्य मोफत कॅन्सर रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल, चंद्रपूर (टाटा मेमोरियल ट्रस्ट, मुंबई) तसेच स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व लोकप्रिय आमदार तथा युवा नेते मा. आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, कॅन्सर आजाराबाबत जनजागृती, मोफत तपासणी, निदान व उपचार सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती व आरोग्यविषयक सल्ला हे या शिबिराचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

हे शिबिर मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी, सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कल्याणेश्वर हनुमान मंदिर, कालरी वॉर्ड, वरोरा येथे पार पडणार आहे.

याच दिवशी श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व वर्धापन सोहळा, तसेच नवीन नियुक्त नगरसेवकांचा सत्कार समारंभ सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मनीषा संजय दानव यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
🙏🏼जय विदर्भ 🙏🏼
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732