रेल्वे स्टेशन चौकात दर महिन्याच्या १६ तारखेला श्री जगन्नाथ बाबांची पूजा-अर्चना व महाप्रसाद
वरोरा:- अभिषेक भागडे
श्री जगन्नाथ बाबा यांच्या कृपेने आणि भक्तिभावाने दर महिन्याच्या १६ तारखेला वरोरा शहरातील रेल्वे स्टेशन चौक येथे सकाळी ८ वाजता भव्य पूजा-अर्चना व महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. व बसमार्फत भांदेवाडा येथे दर्शनाकरिता भक्तजन जातात. यामध्ये प्रामुख्याने आयोजक हरीश जी केशवानी, विजय पानघाटे, सुरज केशवानी यांनी विद्यार्थ्याला लागणारी आवश्यकत वस्तूचा वाटप करण्यात आला.सदर कार्यक्रमात वरोरा शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ अर्चना आशिष ठाकरे उपाध्यक्ष योगिताताई नेरकर नगरसेवक मनीष जेठांनी, गणेश भिवधरे, राहुल देवडे, अनिल भाऊ झोटिंग, नलिनी आत्राम, बंडूभाऊ देऊळकर,प्रवीण चिमूरकर यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ वरखडे, लखन भाऊ केशवानी,प्रवीण भाऊ सुराणा, शाम ठेंगडी सर, मनोहर स्वामी सर , प्रकाश पोहाणे, ओम यादव, अमित घोडमारे, अशोक पराते, शेख, जब्बार, राहुल पानघाटे, सौ. सावित्री पानघाटे इतर महिला व भक्तगण उपस्थित होते सदर कार्यक्रम हा गेल्या चार वर्षापासून दरवर्षी वर्षाच्या पहिला 16 तारखेला करण्यात येतो इतर जिल्ह्यातून व बाहेरून येणारी संख्या यावरून कळते की सद्गुरु जगन्नाथ महाराज यांची सेवा व श्रद्धा अपाट आहे.
या पवित्र उपक्रमाचे आयोजन श्री जगन्नाथ बाबा सेवा समिती, रेल्वे स्टेशन चौक, वरोरा यांच्या वतीने करण्यात येत असून, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
कार्यक्रमात प्रथम विधीवत पूजा-अर्चना करण्यात येते, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. विशेष म्हणजे, हा उपक्रम पूर्णतः भक्तवर्गाच्या देणगीतून राबविण्यात येत असून, कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक उद्देश नसून केवळ सेवा व श्रद्धा हाच त्यामागचा हेतू आहे.
शहरातील नागरिकांनी, भाविकांनी व प्रवाशांनी या आध्यात्मिक आणि सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
॥ श्री जगन्नाथ बाबा की जय ॥
🙏🏼 जय विदर्भ🙏🏼
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




