महानगरपालिका निवडणूक : मतदान–मतमोजणीदरम्यान शहरातील वाहतुकीवर कडक निर्बंध
१४ ते १६ जानेवारीपर्यंत महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांना पूर्ण बंदी
चंद्रपूर :- अभिषेक भागडे
चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी रोजी मतदान व १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून, या कालावधीत शहरातील वाहतूक व्यवस्थेत कडक व निर्णायक बदल करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस आणि आक्रमक पावले उचलली आहेत.
शहरातील इंडस्ट्रियल ईस्टेट वार्ड, एम.आय.डी.सी., बंगाली कॅम्प चौक येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली असून, झोनच्या मागील बाजूस १४ ते १६ जानेवारी दरम्यान निवडणूक वाहनांसाठी व बसेससाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
🚫 या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्ण बंदी
1️⃣ शिवशक्ती सिमेंट प्रोडक्शन ते हिरामोती फर्निचर दुकान
2️⃣ हिरामोती फर्निचर दुकान ते आर्यन के स्टोअर शॉप
3️⃣ मराठा फॅब्रिकेशन दुकान ते एम.एस.सी.बी. कार्यालयाच्या आतील परिसराकडे जाणारा रस्ता
वरील सर्व रस्ते सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी या मार्गांवर वाहने पार्क करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
⏰ अधिसूचना कालावधी :
१४ जानेवारी सकाळी ८ वाजेपासून ते १६ जानेवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही वाहतूकबंदी लागू राहणार असून, परिस्थितीनुसार त्यात आवश्यक ते बदल करण्यात येऊ शकतात.
🚔 स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त इतर सर्व नागरिकांसाठी हा परिसर पूर्णतः बंद राहणार आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.
🛑 कायद्याचे पालन करा – लोकशाहीचा उत्सव शांततेत साजरा करा!
🙏🏼 जय विदर्भ🙏🏼
बातमी ओ जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




