⭕🙏 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांना भव्य अभिवादन!🙏⭕

🔥 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांना भव्य अभिवादन! 🔥

चिनोरा येथे महिलाशक्तीचा दणदणीत जागर – सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

चिनोरा :- अभिषेक भागडे

समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त चिनोरा येथे महिलाशक्तीचा अभूतपूर्व जागर अनुभवायला मिळाला.
सावित्रीच्या लेकी बहुउद्देशीय महिला मंडळ, चिनोरा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चैतन्य निर्माण केले.

दि. 12 जानेवारी 2026, सोमवार रोजी सकाळपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली.
दुपारी 12 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस रॅलीद्वारे अभिवादन,
दुपारी 2 वाजता महिलांचे खेळ,
तर सायंकाळी 5 वाजता प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

🎤 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुशिलाताई तेलमोरे (अध्यक्ष – सावित्री च्या लेकी बहुउद्देशीय महिला मंडळ) होत्या.
👁️‍🗨️ प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निलेशभाऊ डोंगरवार (ग्रामपंचायत सदस्य),सो. परचाके ताई सरपंच चीनोरा
मा. जांभुळे सर, मा. जानेश्वर सावसागडे (B.D.O.),टीपले सर तसेच प्रमुख वक्ते मा. गोविंदराव बोराडे (सामाजिक कार्यकर्ते) प्रकाश जी महाकाळकर, यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

🌟 विशेष अतिथी म्हणून
मा. सौ. सुषमाताई श्रीनिवास शिंदे,
मा. सौ. शोभाताई महाकाळे,
मा. सौ. ज्योतिताई रामटेके,
मा. साळवे ताई यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर ठाम भूमिका मांडली.

💥 “एकल महिला असूनही आर्थिक संकटांवर मात करत आपल्या मुलांना घडवणाऱ्या मातांचा सन्मान” या प्रेरणादायी संकल्पनेतून कार्यक्रमाला सामाजिक खोली लाभली.

🔥 महिलाशक्ती, शिक्षण, संस्कृती आणि स्वाभिमानाचा हा सोहळा म्हणजे सावित्री–जिजाऊंच्या विचारांना जिवंत ठेवणारा क्रांतिकारक उत्सव ठरला.
चिनोरा परिसरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत असून आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

✨ महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

✊ जय सावित्री! जय जिजाऊ!
✊ महिलाशक्तीचा विजय असो.
🙏🏼 जय विदर्भ🙏🏼
{ बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.}
☎️ 9673574711
☎️ 8329889732