⭕🙏 वरोरा येथील रेल्वे पुलाच्या समस्येबाबत डी आर एम यांना निवेदन 🙏⭕

*डीआरएम चा सकारात्मक प्रतिसाद; गड्ढे बुजविण्याचे आश्वासन*

वरोरा : प्रतिनिधी-मो. शफी मो.अकबर                             📞 7350676733

 

नागपूर–चंद्रपूर रेल्वे मार्गावरील वरोरा शहरात असलेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी मध्य रेल्वे प्रशासन, नागपूर येथील सीआरएस मनोज अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांना वरोरा नगरसेवक 1) बंडू भाऊ देऊळकर,2) राहुल भाऊ देवडे, 3) संतोष भाऊ पवार व वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.
जनसमस्येच्या संदर्भात निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरोरा शहराचा झपाट्याने विस्तार होत असून रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली आहे. परिणामी हा पुल सध्या दैनंदिन वाहतुकीचा मुख्य मार्ग ठरला आहे. पुलाची उंची कमी असणे, रस्ता अरुंद असणे, पुलाआतील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे तसेच नाल्याचे सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक व आपत्कालीन सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वरोरा रेल्वे स्टेशनवर भद्रावती, चिमूर व वणी तालुक्यातील प्रवासी मोठ्या संख्येने अवलंबून असल्याने येथे वर्षभर प्रवाशांची गर्दी असते. वरोरा रेल्वे स्टेशन परिसरातील पुल लोकसंख्येच्या गरजेनुसार अपुरा ठरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुलाखालील मार्गावरील खड्डे बुज वावे, दुरुस्ती करावी, पुलाचे विस्तारीकरण करावे किंवा नवीन अंडरपास, नागपूरच्या लोहा पुलाच्या धर्तीवर उड्डाणपूल अथवा पर्यायी पुल उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
वर्धा – बल्लारशा सेक्शन मध्ये चिकणी – वरोरा – माजरी मार्गावर किमी 819.926 व किमी 842.640 पर्यंत तृतीय लाईन खंड निरीक्षण व गती परीक्षणासाठी आलेल्या सीआरएस च्या टीम मध्ये उपस्थित विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर त्यांना विस्तारपूर्वक पुलाच्या संदर्भातील समस्यांबाबत माहिती दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे पुलाखाली बननेले खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सिनीभर डीसीएम अमन मित्तल,सिनिअर डीओएम क्रिश कांत पाटील, वराय येथील सामाजिक कार्यकर्ते किरण कामड़ी, सौरभ लोहकरे, पिंटू धोपटे, विक्की शर्मा, रवी दातारकर, ठाकूर, संजय किटकुरे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी – कर्मचारी, व परिसरातीलगणमान्य नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

🙏जय विदर्भ 🙏

🛑 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 🛑

☎️ 9673574711

☎️ 8329889732