🔥 वरोऱ्यात क्रिकेटचा महाकुंभ! ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य ‘मॅच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ – हजारो ची बक्षिसे, जिल्हा भरातून संघांचा ओघ! 🏏🔥
वरोरा : ✍️ अभिषेक भागडे
प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर वरोरा शहरात क्रिकेटप्रेमींसाठी क्रिकेटचा महासंग्राम रंगणार असून प्रारंभ बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने कमला नेहरू वॉर्ड येथे भव्य मॅच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे जोरदार आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा डे-नाईट हाफ पिच व शॉर्ट सर्कल या दोन्ही प्रकारांत खेळवली जाणार असून २१ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत क्रिकेटचे थरारक सामने रंगणार आहेत. जिल्ह्या भरातून नामांकित संघांनी सहभागासाठी तयारी सुरू केली असून वरोऱ्यात खेळाडू, प्रेक्षक व क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
🏆 हजारोची रोख बक्षिसे – विजेत्यांसाठी सुवर्णसंधी!
या स्पर्धेत
🥇 प्रथम पारितोषिक-33333/- + भव्य चषक
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹22222/- + चषक
🥉 तृतीय पारितोषिक – ₹11111/- + चषक
अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
🎉 भव्य उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरणासाठी लोकप्रतिनिधी, मान्यवर पाहुणे, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून हा सोहळा वरोऱ्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.
✴️*विशेष आकर्षण*✴️
भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर महिला संघाचा उद्घाटनीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे…
⚡ खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह – वरोरा बनणार क्रिकेटचे केंद्र!
ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता तरुणांच्या ऊर्जा, कौशल्य आणि स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणारी ठरणार आहे. वरोरा शहर पुन्हा एकदा क्रिकेटच्या नकाशावर ठळकपणे झळकणार हे निश्चित!
📞 नोंदणी व माहितीसाठी आयोजकांशी त्वरित संपर्क साधावा, कारण मर्यादित प्रवेश, पण अमर कीर्ती!
🔥 वरोरा सज्ज आहे… क्रिकेटचा रणसंग्राम पाहण्यासाठी! 🔥
-🙏 जय विदर्भ 🙏-
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




