निवडणूक होताच कामाला सुरुवात! चिर घर प्लॉट परिसरातील नाली सफाईला गती
वरोरा: ✍️ अभिषेक भागडे
प्रभाग क्रमांक १० मधील चिर घर प्लॉट परिसरात साचलेल्या कचरा व गाळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र निवडणूक होताच लोकप्रतिनिधींनी आपली कार्यतत्परता दाखवत थेट कामाला सुरुवात केली आहे. प्रभागाचे नगरसेवक कुणाल रुयारकर व नगरसेविका सौ. सीमा सचिन तडस यांच्या पुढाकारातून येथील नाल्यांची सखोल साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
या नाली सफाईमुळे पावसाळ्यात होणारा पाणी साचणे, दुर्गंधी तसेच आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या तत्काळ कारवाईचे स्वागत करत, “निवडणूक संपताच कामाला लागणारे लोकप्रतिनिधी म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नगरसेवक कुणाल रुयारकर व नगरसेविका सौ. सीमा सचिन तडस यांनी सांगितले की, प्रभागातील मूलभूत सुविधा सुधारणे हेच आमचे प्राधान्य असून स्वच्छता, पाणी निचरा व आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम केले जाईल.
चिर घर प्लॉट परिसरातील नाली सफाईचे हे काम म्हणजे वचनपूर्तीची सुरुवात असून, प्रभाग क्रमांक १० च्या सर्वांगीण विकासाचा ठोस संदेश यातून नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.
🙏जय विदर्भ🙏
बातमी व जाहिराती करीता संपर्क साधा. ☎️ 9673574711☎️8329889732




