चंद्रपूर : ✍️ अभिषेक भागडे
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने थेट राजकीय शक्तिप्रदर्शन करत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे लोकप्रिय, विकासाभिमुख व दूरदर्शी नेतृत्व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भव्य रोड शोने चंद्रपूर शहरात राजकीय भूकंप घडवून आणला. अभूतपूर्व जनसमुदाय, प्रचंड उत्साह आणि घोषणांनी अवघे शहर दुमदुमून गेले.
रोड शोच्या सुरुवातीलाच मा. मुख्यमंत्री साहेबांनी चंद्रपूरचे आराध्यदैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या समृद्ध भविष्यासाठी प्रार्थना केली. या दर्शनाने आणि त्यांच्या उपस्थितीने चंद्रपूरच्या राजकारणात नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि विकासाचा नवा संकल्प निर्माण झाला आहे.
आंचलेश्वर गेट – गांधी चौक – जटपुरा गेट या मुख्य मार्गावरून निघालेल्या या ऐतिहासिक रोड शोमध्ये “भाजप जिंदाबाद”, “फडणवीस साहेब आगे बढो” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता, चंद्रपूरचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो आहे, हे स्पष्ट दिसून आले.
या शक्तिशाली रोड शोला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी भैय्या अहिर, आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री मा. प्रा. डॉ. अशोकजी उईके, ज्येष्ठ नेते मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार श्री. बंटीभाऊ भांगडिया, आमदार श्री. करणदादा देवतळे, तसेच शिवसेना नेते श्री. किरणजी पांडव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महायुतीच्या नेतृत्वाने एकजुटीचा आणि विजयाचा स्पष्ट संदेश दिला.
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच चंद्रपूरचा विकास” असा ठाम निर्धार व्यक्त केला. जागोजागी करण्यात आलेल्या भव्य स्वागतामुळे संपूर्ण शहर उत्सवात न्हाऊन निघाले.
⚡ विकास, विश्वास आणि निर्णायक नेतृत्व — चंद्रपूरचा स्पष्ट कौल भाजपसोबत! ⚡
महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी भाजपने विजयाचा बिगुल फुंकला असून, विरोधकांसाठी ही घंटा धोक्याची ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
-🙏जय विदर्भ🙏-
{बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.}
☎️ 9673574711
☎️8329889732




